कामठी तालुक्यातील तरोडी (बु.) येथे जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांची विकासाची या अभियानाचे आयोजन

आज दि. २५/०५/२०२३ ला तरोडी (बु.) येथे नागरिकांची विविध विभागाची प्रलंबित कामे मंडळ स्तरावर मार्गी लावणेसाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व नागरिकांना देण्यासाठी व लाभ मिळवून देण्यासाठी जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांची विकासाची या अभियानाला प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या समजून संबंधित विभागाला समस्या मार्गी लावण्यासाठी निर्देश दिले.

प्रसंगी उपस्थित कु. दिशाताई चनकापुरे सभापती पं.स. कामठी, श्री. आशिषजी मल्लेवार माजी उपसभापती तथा सदस्य पं.स. कामठी, सौ. सोनूताई कुथे सदस्य पं.स. कामठी, सौ. आरतीताई चिकटे सरपंच ग्रा.पं. तरोडी (बु.), श्री. मनोजजी कुथे सरपंच ग्रा.पं. परसाड आणि संबंधित विभागाचे सर्व अधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.