नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नोकरी चे फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी वर गुन्हा दाखल

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी काही बेरोजगारांना शासकीय नोकरीचे आमिष देऊन एम्प्लॉयमेंट एज डिफेन्स सिविलीयन एम्प्लॉयमेंट अशा पदाकरिता बनावट अपॉइंटमेंट पत्र बनवून फसवणूक करणाऱ्या मृतक आरोपी विरुद्ध भादवी कलम 420,417,468 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतक आरोपीचे नाव विश्वजित कुमार धमगाये वय 26 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आरोपीने कामठी येथील सैन्य विभागाशी निगडित विभागात डिफेन्स सिविलियन एम्प्लॉयी या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष देत कुंभारे कॉलोनी रहिवासी फिर्यादी राहुल आनंदराव हुमने वय 26 वर्षे तरुणाने तसेच इतर बेरोजगार सात तरुणांनी आरोपीस सात डिसेंबर 2021 ते 13 सप्टेंबर 2022 दरम्यान ला 49 लक्ष आठ हजार 82 रुपये दिले मात्र आरोपीने नोकरी लावून दिली नसून दिलेले अँपॉइंटमेंट लेटर हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले बरेचदा फसवणूक झालेल्या तरुणांनी आरोपीस दिलेली रक्कम परत मागण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत होता त्यावरून फसवणूक झालेल्या सात तरुणांनी स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून मृतक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.उल्लेखणीय आहे की मृतकं आरोपीने सहा महिन्यापूर्वीच गळफास लावून आत्महत्या केली हे इथं विशेष!