कामठीतील प्रभाग क्र 16 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर याच्या शुभ हस्ते करण्यात आले

जनतेला जनसुविधा पुरविणे हे तेथील लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे याचं उदार भावनेतून माझ्या कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत आमदार टेकचंद सावरकर यांनी प्रभाग क्र 16 येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी प्रभाग क्र 16 येथील मूलभूत सुविधेकरिता विविध विकासकामासाठी मंजूर 2 कोटी 17 लक्ष 45 हजार 487 रुपयाच्या निधीतून बांधकामाचे कुंभारे कॉलोनी, शिवछत्रपती नगर व आझाद नगर येथे भूमीपूजन करण्यात आले.या कामांतर्गत प्रभाग क्र 16 येथे विविध ठिकाणी सिमेंट रस्ता, नाली,नाली कव्हर,पेव्हिंग ब्लॉक, सिमेंट फ्लोरिंग बांधकामचा समावेश आहे.याप्रसंगी माजी नगरसेवक प्रतिक पडोळे, लालसिंग यादव माजी नगरसेविका स्नेहलता गजभिये ,भाजप महामंत्री कामठी शहर उज्वल रायबोले, रमेश वैद्य ,मंगेश यादव ,सुनील खानवानी ,राज हाडोती व रोशनी कानफाडे, बाबुल वाघमारे, पवन लांडगे, नवीन कोडापे, ओमप्रकाश कांबळे, संदेश मेश्राम ,निखिल कळसकर आदी उपस्थित होते.