भाजपच्या बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियानाचा कामठी शहरातील प्रभाग क्र.15 मधील रामगढ येथे प्रारंभ

केंद्रातील मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येत असलेल्या विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाचे कल्याणकारी निर्णय घरोघरी पोहचवा असे आवाहन भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी केले दि. २० जून ते ३० जून या कालावधीत देशातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदार संघात बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत माजी मंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नागपुर जिल्हा महामंत्री व कामठी विधानसभा निवडणुक प्रमुख अजय बोढारे यांच्या मार्गदर्शना खाली कामठी शहरातील बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवार दि. 22 जुन रोजी करण्यात आला.

कामठी शहरातील प्रभाग क्र.15 मधील बुथ क्र 78 आणि बुथ क्र.79 मधील योगिराज महादुले,अजाबराव डोंगरे, सागर पाली, कालूराम दुर्गे, प्रेमलाल कनोजिया, मुकेश बाराहाते, पूरनलाल बोरकर, संतोष पुरी यांना उज्वल रायबोले यांच्या हस्ते माहिती पत्रक देऊन करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले, सुनिल वक्कलकर यांच्यासह माजी नगरसेविका संध्या रायबोले,बुथ प्रमुख अरविंद चवडे, बादल कठाने,दिनेश खेडकर, शंकर चवरे, रोहित दहाट आणि कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.