सभापती अवंतिका लेकुरवाळे याच्या उपस्तीथी कामठी ता. अंतर्गत येणाऱ्या ग्राम. तरोडी बु येथील समाज भवन इथे घेण्यात आली आढावा सभा

जि.प.सदस्य नागपूर यांच्या नेतृत्वात मागील दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तरोडी (बु) येथील समाज भवन इथे आढावा सभा घेण्यात आली.

अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची सखोल चौकशी करून त्वरित अहवाल सादर करावा असे सांगितले.

आणि नुकसान ग्रस्त शेतकरी यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा व कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.

तसेच जिल्हा परिषद चे कनिष्ठ अभियंता यांचे कडून रस्ता, पूल,CD Work यांच्या झालेल्या नुकसान विषयी आढावा घेतला.

या प्रसंगी प्रा अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे महिला व बालकल्याण समिती सभापती, नागपूर

सत्तापक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर, आशिषजी मल्लेवार उपसभापती पं.स. कामठी, #दिलीपजी_वंजारी सदस्य पं.स. कामठी, डाखोळे सर विस्तार अधिकारी पं.स. कामठी, अनवाने सर मंडळ अधिकारी, लोखंडे सर कृषी अधिकारी कामठी, तसेच सर्व सन्मानीय सरपंच, उपसरपंच, सचिव,कृषी सहाय्यक आणि सर्कल मधील प्रतिनिधी उपस्थित होते.