एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक

एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे .

कष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडे सोपवताना काळजी घेणे आवश्यक आहे. अल्पावधित पैसे वाढवून देण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवु शकते.चांगला परतावा, आकर्षक व्याज आणि कमी कालावधीत रक्कम दुप्पट हे सध्या फसवणुकीचे फंडे बनले आहेत.त्यामुळे कोणत्याही खासगी क्षेत्रात पैसे गुंतवताना एकदा नव्हे तर दहा वेळा विचार करणे गरजेचे झाले आहे.

कामठी शहरातील बहुतांश तरुणाची काही ठग्यांनी चांगला मोठा परतावा देण्याचे आमिष देऊन शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयाने आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे.त्याचबरोबर एका चिटफंड कंपनीने चांगला परतावा देण्याचे आमिष देऊन कामठी शहरातील शेकडो पेक्षा जास्त तरुणांची कोट्यवधी रुपयाने आर्थिक फसवणूक केली आहे.

सुरुवातीला काही गुंतवणूक दाराणा चांगला परतावा देखील देण्यात आला मात्र दोन दिवसांपासून हा परतावा मिळने बंद झाले आहे.तसेच गुंतवलेले गुंतवणूक रक्कम ही ह्या तरुणांच्या खात्यात आलेली नाही .मुळातच एक फर्म दर महा चार टक्के किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेच्या व्याज दरपेक्षाही कित्तेकाना जास्त परतावा कशी देऊ शकते.

ही बाब विचार करायला लावणारी आहे.गुंतवणूक दारांनी सुरवातीला कसलाही विचार न करता अल्पावधीत मोठी रक्कम मिळत असल्याने गुंतवणूक केली.त्याकरिता ठकबाजानी ऑनलाइन एजंट नेमले त्यांना त्यांच्या आयडी खाली जोडलेल्या गुंतवणूक दारावर आकर्षक कमिशन सुद्धा देण्यात येत होती.त्या एजेंटनी सावध होऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायला भाग पाडले.

गुंतवणूकदारांनी जी रक्कम गुंतवली ती रक्कम सुरक्षित राहणार व त्यावर मोठा परतावा मिळणार असलयाची खात्री देत गुंतवणूक रक्कम सुरक्षित राहणार आणि त्यावर मोठा परतावा मिळणार या विश्वासाने हव्यासापोटी अनेकानी मोठी गुंतवणूक केली व त्यातच ते फसले. कामठी शहरातील बहुतांश तरुणांचे कोट्यवधी रुपये बुडाले त्यामुळे पैश्याची गुंतवणूक करताना गुंतवणूक दारांनी मिळणाऱ्या लाभापेक्षा गुंतवणूक करणाऱ्या रकमेचे विचार करणे गरजेचे झाले आहे.