ग्रामपंचायत रनाळा इथे विजय पुरुषोत्तम ठाकरे यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड

तालुक्यातील मौजा रणाला ग्रामपंचायत येथे सोमवार रोजी सरपंच पंकज साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. तंटामुक्ति समिती अध्यक्षपदासाठी इच्छुकांना संधी देण्यात आली. इच्छुकानी नावे दिली. गावातील नागरिकांनी जवळपास एकतर्फी कल दाखवून विजय उर्फ बाल्या यांची बहुमताने तंटामुक्ति समिती अध्यक्षपदी निवड केली. तसेच वन समिती वरसेवानिवृत्त शिक्षण मधुकर गिरी यांची अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली.

सचिव राजू फरकाडे, सदस्य प्रदीप उर्फ बाल्या सपाटे, सदस्य आमीर खान, सदस्य स्वप्नील फुकटे, सदस्य अस्मिता महेंद्र भोयर, सुनीता नांदेश्वर, अंगणवाडी सेविका अनुराधा नवले, वंजारीताई, सतीश बावणे, सतीश नवले सह ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थिती होते.