धक्कादायक! जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या रुईगंज मैदानात राहणाऱ्या विवाहित मृतदेह वैनगंगा नदी पात्रात मिळाला

कामठी मधून बेपत्ता असलेले विवाहित महिलेचे शव भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पात्रात मिळाले स्थानीय जुनी कामठी हद्दीत येणाऱ्या रुईगंज मैदानात राहणारी २८ वर्षीय महिला बे पत्ता असल्याची तक्रार महिलेचा पती मंगेश मलवे यांनी ७ जून ला केली होती २ दिवसानंतर भंडारा इथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ९ जून ला सकाळी ९ वाजता मच्ची पकडणाऱ्या ना पाण्यात कोणी तरी तरंगताना दिसून आलं याची सूचना भंडारा पोलिसांना देण्यात आली मृतक महिलेची ओडख पटली नसल्याने महिलेचा मृत देह हा दोन दिवस भंडारा येथील शासकीय रुग्णालयात फ्रिज मध्ये ठेवण्यात आले होते आज १२जून ला मृतक महिलेची ओडख प्रियांका उर्फ वर्षा मंगेश मलवे अशी पटल्याने भंडारा पोलिसांनी महिलेच्या माहेरी व सासरीच्या मंडळी ला माहिती देऊन ओडख पटवली जुनी कामठी पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे