ग्रामपंचायत रणाळा येथील समाज भवन इथे महिला समूहाची घेण्यात आली आढावा बैठक

ग्रामपंचायत रनाळा समाज भवन येथे मातृवंदे समुहच्या सर्व महिलाद्वारे गावातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक नवीन सुरुवात करण्यात आली यासाठी जिल्हा परिषद नागपूर महिला व बाल विकास सभा समिती सभापती अवंतिका रमेश लेकुरवाळे यांना आमंत्रित करण्यात आले.

गुरुवार दि. २२-६-२०२३ रोजी या आढावा बैठकीचे उद्देश्य महिकांन आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण देण्याबाबत जिल्हा परिषद नागपूर महिला व बालविकास समिती सभापती अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी मार्गदर्शन केले व महिला घरी राहून कशाप्रकारे आत्मनिर्भर बनू शकतात व त्यांनी काय करायला हवे. तसेच महिलांसाठी येणाऱ्या शासकीय विविध योजना बद्दल माहिती दिली आणि गावातील महिलांना निशुल्क शिलाई प्रशिक्षण देण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. ज्यामध्ये ३० पेक्षा जास्त महिलांनी आपले नाव नोंदविला आहे आणखीही जर गावातील महिला या प्रशिक्षण घेण्याची इच्छुक असेल तर आपले नाव मातृवंदे स्वयंसहायता समुह च्या महिलांन जवळ आपले नाव नोंदणी करू शकतात असे महिलांना निवेदन करण्यात आले आहे.

या आढावा बैठकीला ग्रामपंचायत सदस्य अर्चना लोंडबाजी ठाकरे, स्मिता महेंद्र भोयर, मंगला सुनील चलपे, मातृवंदे स्वयं सहायता समूह अध्यक्ष जयबाला योगेश शर्मा, सचिव छाया अरुण गिरी, कोषाध्यक्ष गुंजन रिंकू महेंद्र, सदस्य सिंमर्तिन श्रीकांत खरे, प्रीती अजय ठाकूर, छायाज्ञानेश्वर पैडलवार, राखीवसंत निनावे, सीमास्वप्निल सुनकीनवार, ज्योती शिवशंकर लुटे, भारती मनोज धानोरकर, बेबी कवड् सुब्बनवार, माधुरी दीपक सुनकिनवार, अन्नपूर्णा उमेश पुरोहित, स्वामिनी स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्ष मोनिका मंगेश ठाकरे, सचिव सोनाली चंद्रकांत बडगे, सदस्य सपना उमेश गिरी, माऊली स्वयंसहायता समूहाच्या मंजू कैलास गोठवाड, आनंदी स्वयंसहायता समुहच्या कोषाध्यक्ष पूनम धीरज शर्मा, तसेच गावातील महिला उपस्थित होत्या या आढावा बैठकीला गावातील महिलांनी भरपूर सहयोग केला आहे