कामठी येथील रनाळा येथे अज्ञात कारनावरून ३० वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील आपल्या राहत्या घरातील खोलीत सिलिंग फॅन ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव सौरभ रामटेके वय 30 वर्षे रा रणाळा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक व त्याची बहिण घरी असता सदर मृतक बराच वेळ होऊन खोलीबाहेर पडला नसल्याने बहिणीने फोन लावून बोलण्याचा प्रयत्न केला असता कुठंलेही प्रतिउत्तर न मिळाल्याने खोलीत डोकावून बघितले असता सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आल्याने एकच धक्का बसला. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मात्र आत्महत्येचे कारण लवकरच स्पष्ट होईल असा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला .मृतकाच्या पाठीमागे आई,वडील,व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.