कामठी तालुक्यतील रनाळा गावातील साईद नगर येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन सरपंच पंकज साबळे याच्या हस्ते करण्यात आले

कामठी तालुक्यातील शहरीकृत असलेले रनाळा गावातील सईद नगर हे गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामा पासून वंचित असल्याने या परिसराचा विकासात्मक चेहरा बद्लविण्याचा निश्चय मनात घेऊन नवनिर्वाचित सरपंच पंकज साबळे यांनी पुढाकार घेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन

सईद नगर येथील मुख्य रस्त्याचे मुख्य समस्या दूर करण्याची विनंती केली त्या विनंतीनुसार आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरपंच पंकज साबळे यांच्या विनंतीला मान देऊन सईद नगर येथे विधीवत निधी मंजूर करून विकास कामाला गती देण्याचे प्रयत्न केले.

या होणाऱ्या विकास कामामुळे सईद नगर येथे येण्या जाण्याचे रस्ते चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल अशी ग्वाही सरपंच पंकज साबळे यांनी दिली.

याप्रसंगी प्रामुख्याने सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य मंगला ठाकरे, आमिर खान यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमात वाहिद खान , बशीर भाई, आफताब भाई गुलाब भाई , आबिद भाई, खालिद भाई , जावेद भाई अशरफ खान , दानिश भाई, शुभम ठाकरे, अंकित रावत, खैरून निसा हमीद अली ,रुखसाना परवीन, मसूदा अंसारी सह समस्त सईद नगर वासी प्रामुख्याने उपस्थित होते.