माजी जि. परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले हज यात्रे करुचे स्वागत

मुस्लिम धर्मातील मक्का मदीना तीर्थक्षेत्र असून ज्यांचे कडे कुणाचे कर्ज नाही,निष्कलंक आहे ,ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा नागरिकांनी जीवनात एक वेळ तरी हजयात्रा करावी अशी संकल्पना आहे त्यानुसार कामठी तालुक्यातील बहुतांश मुस्लिम समाजबांधव हजयात्रेला जात असून त्या ठिकाणी एक महिना सर्व मुस्लिम समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी नमाज पठण वगैरे धार्मिक विधी करीत असतात.अशा प्रकारे कामठी तालुक्यातील विविध भागातून हजयात्रेला जाणाऱ्या मुस्लिम समाजबांधवांचे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी भेट घालत त्यांचे स्वागत करून हजयात्रेच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मो इर्शाद शेख, ग्रा प सदस्य सतीश दहाट, सुमेध रंगारी,अभिषेक चिमनकर, मोबीन भाई आदी उपस्थित होते.