ग्रामपंचायत केम इथे विविध विकास कार्याचे भूमिपूजन प्रा. अवंतिका र. लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण जी प नागपूर याच्या प्रमुख उपस्तिथी करण्यात आले

कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केम येथे जन सुविधा योजना व अ. जा न. घ. या योजनेअंतर्गत मंजूर विकास कामांचे भूमिपूजन आज 21 जून ला प्रा. अवंतिका र. लेकुरवाळे. (सभापती महिला व बालकल्याण जी प नागपूर). यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या कामाला प्रमुख पाहुणे म्हणून दिशा चणकापुरे सभापती पंचायत समिती कामठी, दिलीप वंजारी उपसभापती पंचायत समिती कामठी, माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य आशिष मल्लेवार प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी केम ग्रामपंचायतला विकास कामाचा निधी कमी पडू देणार नाही अशी हमी प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी गावकऱ्यांना दिली. उपयोगी विकास कामे ग्रामपंचायतला आम्ही देत राहू असे सर्व पदाधिकारी यांनी ग्वाही दिली. भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत केम च्या वतीने करण्यात आले होते .ज्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच अतुल बाळबुधे, उपसरपंच नरेश महलले, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र फलके,चंद्रकांत नरड, शितल पंचबुधे, शारदा खंडाळे,निर्मला महले, जोशना मानवटकर, गावातील वरिष्ठ नागरिक माजी सरपंच गुणवंत फुलझेले, सुरेश नरड कोठीराम महल्ले, गणेश देऊळकर, देवराव कुथे, कैलास नरड , ग्रामपंचायत सचिव विकास शहारे प्रवीण महाले,रुपेश अतकरे, योगेश ब्राह्मणकर,संजय चापले नीलकंठ मेंढे सुरज कांबळे, अभय बालबुधे, गणेश बांगडे,सुधाकर चौधरी,नरेंद्र चौधरी, गुरुदेव कुथे,सुनील मारोडे, हर्षल ढोबळे, देवमन आकरे,निशिकांत फुलझले, नितेश खेडकर समस्त गावकरी नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.