ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून केली आत्महत्या

स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज सिटी टाऊनशीप कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नसल्याची प्राथमिक माहिती असली तरी या आत्महत्या प्रकरणाने विविध प्रश्नांना पेव फुटले आहे.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.तर मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे