कवठा येथे पं.स.सभापती दिशा चनकापुरे यांचे हस्ते करण्यात आला कचरा गाडीचा शुभारंभ आणि कर्तबगार महिलांचा सत्कार

कामठी तालुक्यातील कवठा येथे पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे यांचे हस्ते कचरागाडीचा लोकार्पण करण्यात आली. विशेष म्हणजे पंधरावा वित्त आयोग निधीमधुन सात लक्ष रुपयाची कचरागाडी आचारसंहीतेमुळे लोकार्पणाच्या प्रतिक्षेत होती त्या कचरागाडीचा शुभारंभ करण्यात आला तसेच आज ग्रामसभेत संचिता शास्त्री व वैशाली देऊळकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला . कार्यक्रमास सरपंच लक्ष्मण सिरसाम, माजी सरपंच नागोराव ढोरे,लोकचंद खुरपूडे, शरद माकडे,विशाल कापसे, रवी कुहीटे,सचिव निलकंठ देवगडे, नम्रता इंगोले, प्रवीण वरठी,सिध्दार्थ वाघमारे, श्रीराम डबले,गोपाल झिंगरे, वितान डोंगरे,सुरज जाधव, सतीश कंगाले,श्रीकांत उगले,मुकेश गजभिये, विमल रडके,कामेश नानेट,व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन व मार्गदर्शन धर्मराज आहाके यांनी केले.