कामठी छावणी परिषदच्या अधिशासी अधिकारी पदी सचिन वड्डे यांचा निवड

कामठी छावणी परिषदच्या अधिशासी अधिकारी पदी नव्याने रुजू झालेले अधिशासी अधिकारी सचिन वड्डे यांचा कामठी कैंटोनमेंट नागरिक मंडल चे पदाधिकारी द्वारा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले दरम्यान छावनी परिषद रहिवासी नागरिकांच्या हितात कार्य करण्याचे सांगत विविध मूलभूत विषयावर चर्चा करण्यात आली यावर नवनियुक्त अधिशासी अधिकारी महेश वड्डे यांनी नागरी हितार्थ कार्यरत राहणार असल्याचे आश्वासित केले दरम्यान उपस्थित प्रतिनिधि मंडलांनी कामठी कैंटोनमेंट च्या नागरिकांची मौलिक समस्यांशी अवगत करीत नागरिक मंडल द्वारा दिलेले पत्र दिनांक 08/05/2023 व 24/05/2023 च्या पत्रावर लक्ष वेधून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी कामठी कैंटोनमेंट नागरिक मंडल चे अध्यक्ष प्रमेंद्र वाही,सचिव सुरिंदर ( मोंटू) भूटानी, हर्ष वहाल,गोपाल सिरिया, राहुल कनोजिया, राजू बेलेकर आदी उपस्थित होते.