नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या नया नगर इथून अज्ञात चोरटयांनी घरा समोरून कार नेली चोरून, सीसीटीव्ही च्या आधारे तपास सुरु

स्थानीय नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया नगर बगीचा नं ४५ इथे मध्य रात्री कार चोरी झाल्याची घटना घडली प्रशांत मदनलाल यादव वय ३८ वर्ष रा बगीचा नं ४५ नया नगर यांनी दिलेल्या माहिती आधारे पोलिसांनी अज्ञात चोरा विषयी ३७९ भादवी कलाम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहे मिळालेल्या माहिती अनुसार फिर्यादीने आपली कार रात्री घरा समोर पार्क केली होती मात्र सकाळी उठून बघताच कार घरा समोर दिसली नाही आली कार चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोदवली MH 40CH 4554 असा चोरी गेल्या कार चा नं असून CCTV च्या आधारे पोलीस चोराचा तपास करीत आहे