कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चंडिका नगर, तरोडी (खु) येथिल मतदान नोंदणी शिबिरा झाले संपन्न

चंडिका नगर, तरोडी (खु) येथे प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती, महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद नागपूर आणि आशिष मल्लेवाऱ, माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती कामठी यांच्या सौजण्याने मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन बुधवार रोजी केले होते. या शिबिरामध्ये मध्ये १८ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींचे नवीन मतदान नोंदणी तर बाहेरून येऊन इथे वास्तव्य करीत असणाऱ्या नागरिकांचे पत्ता बद्दल आणि नाव करेक्शन इत्यादी प्रकारची सुविधा देण्यात आली. शिबिराला चंडिका नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व २०० पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.